आज के इस पोस्ट में हम “संविधान दिन निबंध मराठी / Savidhan Din Nibandh Marathi” के बारे में जानेगे अगर आप को मराठी में पोस्ट पढना पसंद है तो, Marathitime.in पर आपको बहुत सरे पोस्ट मिल जायगे, चलिए देखते है की मराठी में संविधान दिन लिखना सीखेगे.

संविधान दिन निबंध मराठी
२६ नोव्हेंबर हा दिवस भारतात ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे,
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. त्यामध्ये अनेक बैठका व चर्चा- सत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाबाबत जनजागृती व डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान लिहिण्यासाठी २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस लागले होते. २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आले.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. प्रत्येक भारतीयाने संविधानाचा अभ्यास करून आपले हक्क व जवाबदाच्या जाणून घेतल्या पाहिजेत. व त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Savidhan Din Nibandh Marathi Video
संविधान दिन मराठी भाषण | Sanvidhan Din Bhashan
आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणीनों….
सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतात ‘संविधान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समिती स्थापन केली गेली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर मसुदा समितीने सादर केलेला मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारला गेला. म्हणूनच, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे संविधान सर्व भारतीयांना एकता, न्याय, समता व बंधुता या मूल्यांच्या आधारावर एकत्र जोडते. त्यातील मौलिक तत्त्वे, मुलभूत अधिकार व कर्तव्ये सर्व भारतीयांना संस्कारित करणारी आहेत.
मित्र हो, भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानापैकी एक आहे. हे संविधान लिहण्यासाठी रवर्षे ११ महिने व १८ दिवस इतका कालावधी लागला होता.
भारत सरकारने २६ नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रथमच ‘संविधान दिन’ साजरा केला. संविधान दिनाचा उद्देश्य हा संविधानाबद्दल जनजागृती करणे व डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार सर्वत्र करणे हा आहे. चला तर मग आपण सर्वांनी एकजुटीने आपले हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाड्या. शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
नको राजेशाही,
नको ठोकशाही,
संविधानाने दिली आम्हां,
महान लोकशाही….
महान लोकशाही
जय भीम, जय भारत !! धन्यवाद !